logo

दोरखंडातील आरोपी बोगस पत्रकाराचा हैदोस ; पोलीस कर्मचाऱ्यांवर खुनी हल्ला

नागपूर : पोलीस गराड्यात दोरखंडाने बांधलेल्या आरोपी बोगस पत्रकाराने मेयो इस्पितळात घालून दोन पोलीस कर्मचाऱ्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उजेडात आली आहे.
मुस्ताक ऊर्फ मुन्ना पटेल अहमद पटेल (48) रा. प्रधानमंत्री आवास योजना, संघर्षनगर, यशोदरानगर, असे आरोपीचे नाव आहे.
मुश्ताक उर्फ मुन्ना पटेल ( 45 ) रा. महेशनगर, भुपेशनगर, गिट्टीखदान , असे आरोपीचे नाव आहे.
मुन्ना पटेल याने सर्वप्रथम 29 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास गोकुलपेठ येथील सोशा कॅफेत जाऊन तेथील मॅनेजर देवेंद्र पटले यांना ‘‘तुम यहा क्या धंदा करते हो, मुझे सब पता है। मै पत्रकार हु’’ असे म्हणून माेबाईल काढून कॅफेचे शुटींग करायला सुरुवात केली.
मॅनेजरने त्याला रेकॉर्डिंग करण्यास मनाई केली व ग्राहकी खराब होते, असे म्हटले असता, त्याने मै पत्रकार हु, मुस्ताक पटेल असे सांगत त्याने, ‘‘मै कॅफे के बारे में कुछ नही छापुंगा, लेकीन मुझे अभी के अभी 1 लाख रूपये देने पडेंगे।’’
मॅनेजरने घाबरून काऊंटर मधील 20 हजार रुपये - काढून त्याला दिले होते . त्याने मॅनेजरला ‘‘तेरे मालीक काे बोल की, बाकी पैसे भी रेडी रखना’’, अशी धमकी देवून निघून गेला.
मॅनेजरने ही घटना कॅफे मालकास सांगीतली होती. 1 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास कॅफेमालक अविनाश भुसारी यांना मोर्बाइलवर मुश्ताक पटेल याने फोन करून ‘‘आज के आज 1 लाख रूपये लगेंगे, नही ताे मै तेरे कॅफेके बारे में पेपरबाजी करके, तुझे सडक पे ला दुंगा।’’ अशी धमकी देवून खंडणीची मागणी केली.
मॅनेजर पटले यांच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी आरोपी मुश्ताक पटेल याच्याविरुद्ध भा. दं. वि. च्या 384, 385, 506 कलमानव्ये गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्याच्या ताब्यातून 11 हजार 220 रुपये रोख, एम.ए. पटेल (संपादक) इंडीया टुडे, पोलीस न्युज, असे प्रिंट असलेले एक आयडी कार्ड जप्त केले होते.
या अटकेनंतर मुन्ना पटेल याला न्यायालय आवारात एका वकीलास धमकी दिल्यावरून अटक करण्यात आली होती.
न्यायालयाने दिलेली पीसीआरची मुदत संपत असल्याने 15 मार्च रोजी पोलिसांनी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी मेयो इस्पितळात नेले होते.
पोलीस कर्मचारी मोहनसिंग ठाकुर, राजेश कोचे, धनपत मंझरेटे, राजेंद्र वानखेडे, मेघा यांच्या ताब्यात हा आरोपी होता.
मोहनसिंग ठाकूर यांनी वैद्यकीय तपासणीकरिता एम.एल.सी कार्ड काढुन वैद्यकीय अधिकाऱ्याकडे तपासणी करीता नेले असता, आरोपी मुन्ना पटेल याने त्या वैद्यकीय अधिकाऱ्यास ‘‘मला तुमचा कडे तपासणी करायची नाही, तुमच्या वरिष्ठांकडे मला तपासणी करायची आहे’’असे जोरजाेरात बोलून अश्लीलशिवीगाळ करीत हाेता. यामुळे ठाकूर आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीस इस्पितळाच्या व्हरांड्यात नेऊन समजावण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी आरोपीने पोलीस कर्मचारी धनपत मंझरेटे यांना धक्का मारून, दंडाला बाधलेली दोरी सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी प्रसंगावधान राखत पोलिसांनी त्याला मेयो पोलीस बुथमध्ये नेले. विक्षिप्तासारखे करीत त्याने चक्क पोलीस कर्मचारी धनपत यांना चावा घेऊन त्यांच्या गुप्तांगावर लाथ मारली. ठाकूर यांचा दोन्ही हाताने गळा दाबला. मेयो सुरक्षा जवान आणि पोलीस सोडवण्यास धावले असता आरोपीने त्यांनाही चावा घेऊन स्वतःचे डोके भिंतीवर आपटले आणि पोलिसांनाच फसवण्याची धमकी दिली. आरोपीने पोलिसांची तारांबळ उडवून दिली होती. त्याच्याविरुद्ध तहसील पोलीस ठाण्यात भा. दं. वि. च्या 307, 353, 332, 294, 506, 309 कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

112
5437 views